Saturday, June 13, 2026

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमुंबईपेनिनसुला रोटरी क्लबचे विद्यार्थ्यांना असेही साह्य

पेनिनसुला रोटरी क्लबचे विद्यार्थ्यांना असेही साह्य

       श्री संत गाडगेबाबा शाळेत       शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई (जयविजय न्यूज) :
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील भिवाळी गावातील श्री संत गाडगेबाबा आदिवासी आश्रम शाळेत बॉम्बे पेनिनसुला रोटरी क्लब व परेल-लोअर परेल सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
प्रकाश पाटकर संस्थापक असलेल्या या संस्थेच्या संकल्पनेतून दरवर्षी रोटरी क्लबला आवाहन करण्यात येते.

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पेनिनसुला आणि परेल, लोअर परेल सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून शालेय उपयोगी वस्तू, क्रीडा साहित्य, औषधे, वाचनालयात पुस्तके ठेवण्यासाठी दोन कपाटे, शाळेतील सहाशे विद्यार्थ्यांना सर्व वस्तू वाटप करून त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्यात आला.

या कार्यक्रमावेळी लेझिम नृत्य करत विद्यार्थिनींनी पाहुण्यांचे स्वागत केले. विजयानंद राजे (वास्तू विशारद) कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होते. एम. एल. डहाणूकर कॉलेज व पोदार कॉलेजचे विद्यार्थी व समाजसेविका छाया गचके , पाटकर कुटुंबीय व मित्र परिवाराच्या मदतीने वह्या, पेन, दप्तर, चादर , कंपासमधील साहित्य, पॅड ,चटई, साबण, रेबिन अशा सर्व साहित्याचे वाटप करण्यात आले.
सरकारी वकील दीनानाथ वालावलकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन केले. पत्रकार आण्णासाहेब आहेर यांनी गाडगेबाबानी हाती घेतलेले स्वच्छ्ता, शिक्षण ह्या बाबींना शाळेतील शिक्षक वर्ग, तेथील मदतनीस अतिशय सुंदर नियोजनात मुलांना स्वच्छ्तेचे महत्व शिक्षणातून घडवत आहेत. निसर्गरम्य वातावरण, कुटुंबीय पासून दूर असणाऱ्या मुलांचे छान आरोग्य पाहून आहेर यांनी सर्व शाळेतील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या शाळेतून गरीब कुटुंबातील मुले- मुली गुणवंत घडत राहावेत, त्यांना चांगले शिक्षण मिळत रहावे ही आपेक्षा व्यक्त केली.
प्रकाश पाटकर यांनी शाळेच्या इतर समस्या जाणून घेत जुन्या हॉलचे सुशोभीकरण व लादी बसवणे, तसेच मुलांना चप्पल स्टँड इतर काही कामे या महिन्यात करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच पंधरा ऑगस्टला सर्व मुलांना गणवेश देण्याचे त्यांनी जाहीर केले. शाळेचे संचालक मा. आवटे यांनी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. या शाळेतून अनेक मुले आज उच्च पदावर आहेत. आताचे विद्यार्थीही स्वतःचे आणि शाळेचे नाव नक्कीच उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध