शां. कृ. पंत वालावलकर माध्यमिक विद्यालयाचा अनोखा उपक्रम
मुंबई (जयविजय न्यूज) : शिक्षक नेहमी शाळेशी संबंधित इतरांच्या पाल्यांचा गुणगौरव करतात, पण त्यांच्या पाल्यांचा गुणगौरव कोण करणार? या प्रश्नावर शां. कृ. पंत वालावलकर माध्यमिक विद्यालयाने मार्गही काढला. त्यांच्या शिक्षकांच्या पाल्यांचा गौरव करण्याचे विद्यालयाने ठरविले आणि गौरव समारंभ घडवूनही आणला.
मार्च २०२२ मध्ये १० वी- १२ वी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचे पाल्य रिया मीनाक्षी, दिगंबर आढारी, सार्थ प्रांजली संजयकुमार गारळे, प्रथमेश मीनाक्षी प्रशांत पाटील, श्रेया प्रेरणा भीमराव खरमाटे, रिया तेजस्विनी अमोल निकम
-पाटील, गार्गी पूजा जयेश पाटील, राजवी सायली राजेश गायकवाड, मनोज पूर्वा नामदेव तडपाडे, गार्गी योगिता गणेश हिरवे, गिरीश प्रीती गणेश सूर्यवंशी (सुतार), अमेय सोनाली संदीप पांडे, भावना सुषमा गोविंद लोखंडे, संचिता सुषमा गोविंद लोखंडे, प्राजक्ता प्रतिभा राजाराम कांबळे, मयुरेश ज्योती( सुवर्णा) राजेंद्र चव्हाण, लक्ष्य सुधा सुभाष सिंग, हर्षल भारती अंकुश गळवे या सर्व पाल्यांना सदिच्छा भेटवस्तू, गुणगौरव प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या व शाळेच्या वतीने गौरविण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सामंत, सचिव सत्येन्द्र दत्तात्रय सामंत, खजिनदार स्नेहल सामंत, शाळेचे मुख्याध्यापक महादेव यादव, उपमुख्याध्यापिका ज्योती नेमाडे, पर्यवेक्षक धुळाजी दडस, सतेश शिंदे, पाटीलबुवा पाचारणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कलारत्न पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक पंकज सोनवणे यांनी पाल्यांसाठी आकर्षक गुणगौरव प्रमाणपत्र तयार केले. सदर कार्यक्रमाचे निवेदन संजयकुमार गारळे यांनी केले, तर उद्धव अमुप यांनी आभार व्यक्त केले.

