Wednesday, February 18, 2026

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमुंबईभारतीय सैनिका सलाम तुला!

भारतीय सैनिका सलाम तुला!

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त समर्थ शाळेतून जवानांना कृतज्ञता ग्रीटिंग कार्ड

मुंबई (जयविजय न्यूज) ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सांगता समारंभानिमित्त जोगेश्वरी पूर्व भागातील बांद्रेकरवाडी येथील समर्थ शाळेतून विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून बनविलेले कृतज्ञता ग्रीटिंग कार्ड सरहद्दीवरील सैनिकांना पाठविण्यात आले.

समर्थ शाळेचे मुख्याध्यापक मधुकर पोर्लेकर, बालविकास आर.जे.एम.डी. शाळेच्या सचिव सुरक्षा घोसाळकर यांच्या मदतीने चैतन्य सोशिअल वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून सविता दोंदे मॅडम, देशपांडे मॅडम व शीतल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने शाळेचा भारतीय जवानांबद्दल असलेला जिव्हाळा, प्रेम, अभिमान याचे प्रतीक म्हणून शुभेच्छापत्र तयार केली. ती शुभेच्छा पत्रे नॉर्थ ईस्टच्या १०६ मिडियम रेजिमेंटला पाठविण्यासाठी दोंदे मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.

सैनिक बांधवाना सुरक्षित आणि आरोग्यदायी दिर्घायुष्य लाभावे अशी सामूहिक प्रार्थना कार्ड तयार करताना विद्यार्थी, शिक्षक व उपस्थित सर्वांनीच केली. जोगेश्वरीतील समर्थ विद्यालय, बालविकास शाळा, जीवन विकास केंद्र, अण्णाभाऊ साठे स्मारक आदी संस्था व शाळांमधून हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी शाळांबरोबर समन्वय साधल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.

जोगेश्वरीतून आपल्या सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांना साधारण साडेतीनशे ग्रीटिंग कार्ड पाठविण्यात येणार आहेत. तसेच यापूर्वी साधारण आठशे शुभेच्छा कार्ड आदिवासी पाड्यातील मुलांकडून तयार करून घेऊन ती पाठविण्यात आली होती, अशी माहिती उपक्रम प्रमुख सविता दोंदे यांनी दिली.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध