मुंबई (जयविजय न्यूज) : जीवनाचा खरा अर्थ गुरुंमुळे कळतो, तसेच शिक्षक हा अखंडपणे हा दिवा तेवत ठेवतो, त्यामुळे त्यांचा सन्मान हा समाजासाठी आनंदोत्सव असतो, असे विचार ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेशभाऊ संकपाळ यांनी व्यक्त केले.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या वतीने ऐरोली येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षक सन्मान सोहळा २०२२ अंतर्गत प्रसिद्ध विधिज्ञ व वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे जनरल सेक्रेटरी अॅड. आप्पासाहेब देसाई यांना सन्मानित करण्यात आले.
शिक्षणसंस्थांचे व्यवस्थापन अधिक सुलभरीत्या व गतिशील व्हावे, यासाठी शासकीय स्तरावरून नियमांची शिथिलता तसेच प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी, यासाठी शिक्षकांनीही सातत्याने प्रयोगशील राहिले पाहिजे, असे विचार अॅड. आप्पासाहेब देसाई यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
जीवनाचा खरा अर्थ गुरुंमुळे कळतो, तसेच शिक्षक हा अखंडपणे हा दिवा तेवत ठेवतो, त्यामुळे त्यांचा सन्मान हा समाजासाठी आनंदोत्सव आहे, असे विचार ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेशभाऊ संकपाळ यांनी व्यक्त केले. यावेळी ज्ञानेश्वर पाटील यांचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक आणि शिवकृपा पतपेढीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत वंजारी, ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या संचालिका साै. वैशाली संकपाळ, शिक्षणसंस्थेचे सचिव तुकाराम नांदगुडे, भरत संकपाळ, सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे हेदेखील यावेळी उपस्थित होते.

