Monday, December 4, 2023

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमुख्य बातम्यामुंबईला एक्सबीबी व्हेरिएंटचा धोका

मुंबईला एक्सबीबी व्हेरिएंटचा धोका

ठाण्यात आढळले १० रुग्ण

राज्यात ३६ रुग्ण

मुंबई (जयविजय न्यूज) : कोरोनापासून राज्य सावरत असतानाच आता मुंबईसह राज्यभरात एक्सबीबी व्हेरिएंटचा झपाट्याने प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. शनिवारी राज्यात ३६ नवीन एक्सबीबी व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असून त्यापैकी १० रुग्ण मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाण्यात आढळले आहेत. त्यामुळे मुंबईला एक्सबीबी व्हेरिएंटचा धोका वाढला आहे.

जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनामुळे लोक दोन वर्षे निर्बंधात जगले. मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग ओसरल्यावर सर्वजण निर्बंधमुक्त जगू लागले. सण-उत्सव आनंदात आणि धूमधडाक्यात साजरे करू लागले. मात्र कोरोनाचा उपप्रकार असलेल्या ओमायक्रॉन विषाणूचा धोका कायम असताना एक्सबीबी व्हेरिएंटचा झपाट्याने प्रसार होत आहे. शनिवारी राज्यात एक्सबीबी व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने टास्क फोर्सने मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, राज्यात एक्सबीबी व्हेरिएंटचे ३६ रुग्ण आढळले त्यापैकी पुणे – २१, ठाणे – १०, नागपूर २ आणि अकोला, अमरावती, रायगड येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळला. एक्सबीबी व्हेरिएंटचे २ रुग्ण ११ ते २० या वयोगटातील असून २१ ते ४० या वयोगटात १३ रुग्ण आहेत. तर ४१ ते ६० या वयोगटात १४ आणि ६० वर्षावरील ७ रुग्ण आहेत. यातील २२ पुरुष तर १४ स्त्रिया आहेत. या ३६ जणांपैकी १९ रुग्णांना काही लक्षणे होती, तर उर्वरित रुग्ण लक्षणविरहित किंवा सौम्य स्वरूपाचे होते.
राज्यातील तसेच सिंगापूर आणि इतर देशांमधील एक्सबीबी या व्हेरिएंटचा अभ्यास करता या नव्या व्हेरिएंटमुळे संसर्गाचे प्रमाण काहिसे वाढले तरी हा नवा व्हेरिएंट सौम्य स्वरूपाचा आहे, असे मत टास्क फोर्सने व्यक्त केले आहे.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध