भारतीय दलित साहित्य अकादमीच्या प्रसिद्धी प्रमुखपदी
ज्येष्ठ पत्रकार शांताराम गुडेकर यांची नियुक्ती
मुंबई : पत्रकार शांताराम गुडेकर यांची भारतीय दलित साहित्य अकादमीच्या मुंबई महानगर प्रदेशच्या प्रसिद्धीप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
शांताराम गुडेकर हे ज्येष्ठ पत्रकार असून तळागाळातील समस्या मांडण्यात ते विशेष प्राधान्य देतात. भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली संलग्न बृहन्मुंबई महानगर प्रदेश (शहर) च्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. राज्य अध्यक्ष पंढरीनाथ पवार व कार्याध्यक्ष दत्ताराम घुगे यांच्या आदेशानुसार मुंबई शहर अध्यक्ष म्हणून रामदास गजरे, तर बृहन्मुंबई प्रसिद्धी प्रमुख म्हणून सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण तसेच पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले शांताराम ल. गुडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. गुडेकर हे कोकणातील असून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून जवळ असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील आंगवली हे त्यांचे मूळ गाव आहे.
भारतीय दलित साहित्य अकादमीच्या बृहन्मुंबई कार्याध्यक्षपदी अनिल बबन कांबळे, अर्जुन पटेल-सहसचिव, पत्रकार भीमराव धुळप-शहर सचिव, शरद बनसोडे-पश्चिम उपनगर जिल्हाध्यक्ष, अशोक उचलमुगले-पश्चिम उपनगर जिल्हा सचिव, पल्लवी थोरात-मुंबई शहर सह सचिव, संजय सोनावणे-पश्चिम उपनगर सहसचिव, विनायक इलग-मुंबई शहर सह सचिव, भूषण अहिर -मुंबई शहर संघटक, अशोक चिते -पश्चिम उपनगर सहसचिव यांची नियुक्ती करण्यात आली.
शांताराम गुडेकर यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्या अनुभवाचा उपयोग दलित साहित्य अकादमीला नक्की होईल असे अध्यक्ष पंढरीनाथ पवार यांनी सांगितले. प्रसिद्धीप्रमुख नियुक्तीमुळे गुडेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

