ासध्या मिळणारी फॅमिली पेन्शन (Family Pension) १५ टक्के असून ती केंद्र सरकारच्या धर्तीवर ती ३० टक्के इतकी असावी. तसेच इन्शुरन्स पॉलिसीची (Insurance Policy) टर्म्समध्येदेखील सुधारणा व्हावी, यासाठी धरणे आंदोलन आहे.
मुंबई ः जनरल इन्शुरन्स (General Insurance) पेन्शनर्स असोसिएशनच्या (Pensioners Association) वतीने निवृत्ती वेतनाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ३१ जानेवारीला आझाद मैदान येथे दिवसभर धरणे आंदोलन (Protest March) आयोजित करण्यात आले आहे.
संघटनेचे चेअरमन काका सामंत, जनरल सेक्रेटरी उदयन बॅनर्जी आणि सतीश शेंडे यांनी संयुक्तिकरीत्या प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या मिळणारी फॅमिली पेन्शन १५ टक्के असून ती अत्यंत तुटपुंजी आहे. तरी केंद्र सरकारच्या धर्तीवर ती ३० टक्के इतकी असावी. जानेवारी २०२० मध्ये मुंबई आणि फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीच्या जंतर मंतर येथे केलेल्या आंदोलनानंतर अर्थ मंत्रालयाने ती ३० टक्के इतकी करण्यास तत्वतः मान्यता दिली होती. त्यानंतर बँकेच्या पेन्शनधारकांची मागणी मान्य झाली परंतु इन्शुरन्स पेन्शनधारकांचा प्रश्न प्रलंबितच आहे. ही मागणी तर मान्य व्हावी, तसेच इन्शुरन्स पॉलिसीची टर्म्समध्येदेखील सुधारणा व्हावी, हेही या धरणे आंदोलनाचे प्रयोजन आहे. या धरणे आंदोलनात अधिकाधिक पेन्शनधारकांनी सहभागी व्हावे आणि शासनाला दखल घेणे भाग पाडावे, असे आवाहनदेखील निवेदनात केले आहे.

