आई-वडील आपल्यासाठी आयुष्य खर्ची घालून स्वतः कर्जबाजारी होतात. जर आपल्याला पळून जायचे असेल तर आपल्या आई-वडिलांना विष घालून पळून जा, हे सांगताच मुलींसोबत मुलांनीही हुंदके द्यायला सुरुवात केली.
प्रवीण किणे यांनी मुलांमध्ये घडविले परिवर्तन
आपले आईवडील पोटाला चिमटा काढतात, पण मुलांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपल्या आई-वडिलांना कधीच खाली मान घालायला लागेल, असे वागू नका, असे प्रवीण किणे (Pravin Kine) यांनी मुलांच्या मनावर बिंबविले आणि ती मुले हुसमसून रडू लागली!
विषय काळजाला भिडला अन्
रत्नागिरीतील (Ratnagiri) गोदूताई जांभेकर (Godutai Jambhekar) विद्यालयात क्रांतीसागर प्रवीण किणे (Krantisagar Pravin Kine) यांनी आई-बाबा यांच्या स्पप्नांची राख करून आपल्या प्रेमाची कथा रचणाऱ्या तरुणासोबत लहान मुलांनाही आई वडिलांच्या कष्टाची जाणीव करून दिली. उसनेपासने घेऊन आपले आईवडील आपल्याला मोबाईल (Mobail) घेऊन देतात मात्र त्यावर वॉलपेपर (Wallpaper) प्रेयसीचा असतो. आई-बापाचं काय, असा प्रश्न या मुलांना विचारला व त्यानंतर सलग अर्धा तास मुले हुसमसून रडत होती. विषय थेट काळजाला भिडला होता. मुलांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. आम्ही घरी जाऊन आई-वडिलांना यांना मिठी मारून नमस्कार करू, असे वचन मुलांनी दिले.
समस्यांची लीलया सोडवणूक
आज काल मोबाईल गॉसिप (Gosip), प्रेमप्रकरणे व मोठी स्वप्ने पाहणे व साकार करणे अतिशय दुर्मिळ होत आहे. मुलांना आपण कोणत्या एसटीत बसलो आहोत हेच माहित नसते. आपले ध्येय निश्चित करा आणि त्याप्रमाणे मार्गक्रमणा करा. मुलांनी आपल्या शिक्षणासमोर आर्थिक अडचणी, शिक्षणाचे माध्यम, कौटुंबिक समस्या, आरोग्य अशा अनेक समस्या मांडल्या. त्या साध्या सोप्या उदाहरणातून हसतमुखपणे किणे सरांनी लिलया खोडून काढल्या.
व्यक्तिमत्वाचे सौंदर्य कर्तृत्वात
आठ वर्षांच्या पदव्या बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी दोन वर्षे तीन महिन्यात पूर्ण केल्या. अब्दुल कलाम (Abdul kalam) यांची परिस्थिती, हात-पाय नसतानाही केवळ तोंडाने चित्रे काढणारी कोल्हापुरातील नसरीमा हुजरूक (Nasarima Hujruk) या संस्थेतील मुले, उंची कमी असून जागतिक किर्ती मिळवलेला सचिन, अपघातात अपंगत्व येऊनही लाकडी पायावर नृत्य करून प्रसिध्द झालेली सुधा चंद्रन अशा अनेक उदाहरणाने त्यांनी मुलांच्या काळजाला हात घातला. शिवाय फेअर-न-लव्हलीने सुंदर होता आले असते तर संपूर्ण आफ्रिका गोरा झाला असता हे सांगून हास्याचे कारंजे उडवतानाच, व्यक्तिमत्वाचे सौंदर्य हे आपल्या दिसण्यात नसून आपल्या कर्तृत्वात असते. त्यामुळेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्यासमोर अनेक नेते झुकतात. त्यामुळे दिसण्यापेक्षा असण्याला महत्व द्या, हे सांगत असतानाच अखेर पालकांच्या मनात असणाऱ्या व टंगळमंगळ करणाऱ्या मुलांच्या काळजालाच हात घातला.
अन् मुलामुलींना हुंदके अनावर
आई-वडील आपल्यासाठी आयुष्य खर्ची घालून स्वतः कर्जबाजारी होतात. जर आपल्याला पळून जायचे असेल तर आपल्या आई-वडिलांना विष घालून पळून जा, हे सांगताच मुलींसोबत मुलांनीही हुंदके द्यायला सुरुवात केली. आपल्यावर प्रेम करणारा मुलगा जर आपल्याला जिंकत असेल तर त्याला आईबापालाही जिंकायला सांगा, तरच तो मुलगा तुमच्या लायक आहे, हे समजावून सांगतानाच दीड तासाच्या अतिशांत वातावरणातही हसू आणि आसू याचा अनोखा संगम मुलांनी अनुभवला.
शाळेचे प्राचार्य चव्हाण (Chavhan) यांनी पालक, विद्यार्थ्याना अशा व्याख्यानाची गरज असून मुलांमध्ये परिवर्तन दिसत असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक चव्हाण यांनी दीड तास मुले चुळबुळ न करता शांतपणे ऐकतात हे आज पाहायला मिळाले, असे सांगून प्रवीण किणे यांचे आभार मानले व पुन्हा या सभागृहात पालकांनाही मार्गदर्शन करायला येण्याचे निमंत्रण दिले.
आईवडिलांच्या आठवणींची व्याकुळता व हसता हसता रडवणारे किणे सर अशा वातावरणात आयुष्याचे परिवर्तन घडवणारे दीड तास संस्मरणीय ठरले.