Sunday, May 17, 2026

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

HomeUncategorized'ते' सक्तीच्या निवृत्तीतून मुक्त

‘ते’ सक्तीच्या निवृत्तीतून मुक्त

दीपक सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश

Jayvijay news : गेली तीन-साडेतीन वर्षांपूर्वी त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला, पण पक्षीय पातळीवरही नामोनिशाण नसलेले माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आणि सक्तीच्या निवृत्तीतून मुक्त झाल्याची भावना व्यक्त करतानाच ते फारच हळवे झाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला खूप दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही खूप दिले. पण गेल्या तीन वर्षांपासून रिटायर केले. मला मंत्रीपद नको, पण काम हवे, अशा शब्दांत दीपक सावंत हळहळले. मात्र काम करणाऱ्या व्यक्तीला कुणीही थांबवू शकत नाही, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी दीपक सावंत यांचे आपल्या पक्षात स्वागत केले.

राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आज ठाकरे गटाची साथ सोडली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुंबईत बाळासाहेब भवन येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला खूप काही दिले. पण गेल्या तीन वर्षांपासून रिटायर केले, असा खेद त्यांनी व्यक्त केला. मला काम करायचे होते. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मला काम मिळेल. मला मंत्री पद नको. मला काम हवे. मी उद्धव ठाकरेंना ऑनलाईन पत्र देऊन, मला काम द्या, अशी मागणी केली, पण मला दुर्लक्षित करण्यात आले, अशा शब्दांत दीपक सावंत यांनी हळहळ व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपक सावंत यांचे स्वागत करताना काम करणाऱ्याला कुणी थांबवू शकत नाही, असे म्हणत आपली भूमिका मांडली. आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी मंत्री असताना पालघर, मेळघाट आणि राज्यातील इतर जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी अगदी दुर्गम भागात काम केले. टेलिमेडिसन ही संकल्पना त्यांचीच होती. दुर्गम भागातही उपचार व्हायला पाहिजे ही संकल्पना त्यांनीच मांडली आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये ज्या काही अडचणी आणि त्रुटी आहेत त्या निदर्शनास आणून देणे आणि त्यावर उपाययोजना करणे याबाबत त्यांनी मोठे काम केले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

दीपक सावंत यांनी राज्यभरामध्ये सर्वसामान्य रुग्ण, नागरिकांना आपल्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून मोठी सेवा केली. अतिशय कमी बोलणारे, पण जास्तीचे काम करणारे म्हणून दीपक सावंत यांची ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही पुढे जातोय. गेल्या सहा-सात महिन्यांत राज्य सरकारने केलेले काम त्यांनी जवळून पाहिले आहे. त्यांनादेखील काम करण्याची आवड आहे. ही आवड कुणाला थांबवू शकत नाही. दीपक सावंत हे बाळासाहेबांचे डॉक्टरही होते. त्यांच्या सानिध्यात काम करण्याचे भाग्य त्यांना मिळाले. काम करण्याची इच्छा असताना सुद्धा त्यांना दुर्देवाने काम थांबवावे लागले. कम्पलसरी रियारमेंट देण्यात आली. पण काम करणारा माणूस थांबत नाही, असे देखील शिंदे म्हणाले.

 

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध