
मुंबई, दि. ४ (जुलै २०२३) : कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या १३२ वर्षे जुन्या असलेल्या संस्थेतर्फे भंडारी समाजातील दहावी, बारावी, पदवी, पदविकाधारक तसेच इतर उच्च शिक्षण परीक्षा उत्तीर्ण (शैक्षणिक वर्ष २०२२-२३) झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी १५ जुलै २०२३ पर्यंत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
दहावी ते पदविकेपर्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कुठेना कुठे सत्कारसमारंभ घडून येत असला तरी घरची शाबासकीची थाप मुलांना प्रेरणा देणारी असते. त्यांचे मनोबल वाढविणारी असते. म्हणूनच मुलांचे कौतुक करताना शिक्षण क्षेत्रातील महनीय व्यक्तिमत्वे यावेळी वक्ते/प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात येतात. त्यामुळे मुलांना प्रगतीचे मार्ग कळतात. करियरच्या संधी समजून घेता येतात. म्हणून समाजातल्या उत्तीर्ण झालेल्या जास्तीत जास्त मुलांनी या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे, असे संस्थेचे अध्यक्ष भरत शेट्ये यांनी म्हटले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवेश अर्ज भरणे आवश्यक आहे. त्यासाठी १५ जुलै २०२३ पर्यंत अर्ज दाखल करता येतील. “कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी” संस्थेचे कार्यालय, दादर, मुंबई, येथे सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत अर्ज उपलब्ध होतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी या संधीचा लाभ घ्यावा, असे संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे
*पात्रता *
दहावी उत्तीर्ण – ७०%
बारावी उत्तीर्ण – ६५%
पदवी, पदविकाधारक – ६०%
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी टक्केवारीची अट शिथिल करण्यांत आलेली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यानी पहिल्या प्रयत्नांत उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, दिव्यांग दाखल्याची तसेच भंडारी ज्ञातीच्या दाखल्याची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
प्रवेश अर्जासोबत (शैक्षणिक वर्ष २०२२-२३) गुणपत्रिकेची आणि भंडारी ज्ञातीच्या दाखल्याची नक्कल प्रत जोडणे आवश्यक आहे. गुणपत्रिकेच्या मागे प्राप्त झालेल्या प्रत्येक विषयाचे क्रमवार गुण लिहून टक्केवारी लिहिणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कित्ते भंडारी सभागृह, दूरध्वनी ०२२२४४५३७७९/०२२२४४६०७५२ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच गरज भासल्यास
विद्यार्थी गुणगौरव समितीच्या
१) संतोष मांजरेकर (८३५५९४७३११),
२) संजय भरणकर (९८२०५१४९५८),
३) अरविंद सुर्वे (९८७०९०१२१८),
४) दत्तात्रय सुर्वे (९८६९३७५६६९),
५) पंकज मोरे (९९२०६३८०६९) यांच्याकडे संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.