Wednesday, February 18, 2026

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमनोरंजन / क्रीडामेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात  'घूमर'चा बोलबाला

मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात  ‘घूमर’चा बोलबाला

मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांना प्रभावित करण्यासाठी आर बाल्कीची ” घूमर ” या चित्रपटाची निवड झाली असून तो एक सिनेमॅटिक चित्रपटाचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे.

आर बाल्की यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘घूमर’ प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाला असून लवकरच प्रतिष्ठित १४ व्या भारतीय चित्रपट महोत्सव ऑफ मेलबर्न (IFFM) मध्ये सुरुवातीचा चित्रपट म्हणून प्रदर्शित होणार आहे. अभिषेक बच्चन यांच्या नेतृत्वाखाली घडलेला हा अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव असून नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडून जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय चित्रपटाचा उत्सव साजरा करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवाने भूतकाळात सातत्याने अपवादात्मक चित्रपट प्रदर्शित केले आहे. ज्यात ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘नीरजा’, ‘कपूर अँड सन्स’, ‘दंगल’, ‘ बाहुबली‘ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे.

आर बाल्की हे त्यांच्या अनोख्या दृष्टी असलेल्या दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. ‘ चीनी कम’, ‘पा’ आणि ‘पॅड मॅन’ यासह अनेक समीक्षकांनी प्रशंसित चित्रपटांसह दिग्दर्शक बाल्की यांनी  भारतीय चित्रपट उद्योगात स्वतःचे अनोखे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे चित्रपट अनेकदा अपारंपरिक विषयांचा शोध घेतात आणि बौद्धिक आणि भावनिक अशा दोन्ही पातळ्यांवर प्रेक्षकांना प्रभावित करतात.

दिग्दर्शक आर बाल्की म्हणतात ” घूमर हा IFFM मधील ओपनिंग चित्रपट असेल ही आमच्यासाठी खरोखरच सन्मानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. घूमर  हा खेळावर आधारित चित्रपट असणार आहे.

‘घूमर’ IFFM मध्ये केंद्रस्थानी असलेला एक अनोखा सिनेमॅटिक अनुभव देणारा चित्रपट असून नक्कीच तो बाल्कीच्या व्हिजनचा एक उत्कृष्ट नमुना असणार आहे. प्रतिभावान अभिनेता अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्यासह त्याच्या वेगळ्या दिग्दर्शन शैली आणि उत्कृष्ट कलाकारांसह ” घूमर” या चित्रपट महोत्सवावर अमिट छाप पाडणार यात शंका नाही. एक ट्रेलब्लॅझिंग फिल्ममेकर म्हणून बाल्की सध्या चर्चेत आहेत.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध