‘कित्ते भंडारी’ संस्थेत सेवकांकडून
रावबहाद्दूरांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण
मुंबई : कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या संस्थेचे संस्थापक, भंडारी समाजाचे मानबिंदू रावबहाद्दूर सी. के. बोले यांच्या १५५ व्या जयंतीदिनी संस्थेच्या सेवकांना त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा बहुमान मिळाला. त्यामुळे त्या सेवकांना त्यांनी केलेल्या सेवेचे चीज झाल्याचे समाधान मिळाले. असे भाग्य फारच थोड्यांच्या नशिबी असते.
भंडारी समाजाची शैक्षणिक प्रगती व्हावी, भंडारी समाजातील युवकांना शैक्षणिक, सामाजिक प्रगतीत साह्य व्हावे यासाठी लोकहितवादी रावबहादूर सी. के. बोले यांनी कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या संस्थेची स्थापना १८९० मध्ये स्थापना केली. ही संस्था १३४ वर्षांची झाली असून दीडशे वर्षांकडे वाटचाल करत आहे.
रावबहाद्दूर सी. के. बोले यांचा जन्म २९ जून १८६९ रोजी पालशेत येथे त्यांच्या आजोळी झाला. गुहागर तालुक्यातील आरे हे त्यांचे मूळ गाव. त्यांची जयंती भंडारी समाजाच्या संस्थांत सर्वत्र साजरी होते. मात्र रावबहाद्दूरांनी स्थापन केलेल्या ‘कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी’ या संस्थेत त्यांची जयंती साजरी होत नाही. तर १४ जानेवारी रोजी वर्धापनदिन साजरा होतो.
जयंतीदिनी उपस्थित पदाधिकारी रावबहाद्दूरांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करतात. एव्हढ्यापुरताच जयंतीदिनाचा कार्यक्रम सिमित असतो. बहुजन संघाचे कार्यकर्ते मात्र जयंतीदिनी न चुकता येऊन रावबहाद्दूरांना पुष्पमाला अर्पण करतात. त्यांचे गुणगान गातात. यंदा मात्र रावबहाद्दूर सी. के. बोले यांच्या १५५ व्या जयंतीदिनी दादरच्या कित्ते भंडारी हॉलमध्ये त्यांच्या प्रतिमेला पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरीत्या पुष्पमला अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी हा बहुमान या संस्थेचे सेवक श्री. प्रवीण गावडे आणि श्री. नितेश गावडे याना मिळाला. तसेच रत्नागिरी येथील कार्यालयातही पदाधिकाऱ्यांनी रावबहाद्दूर सी. के. बोले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करत आदरांजली वाहिली.
पदाधिकाऱ्यांमुळे संस्थेचा कारभार चालतो, हे खरे असले तरी खऱ्या अर्थाने संस्थेचा कारभार तेथील कर्मचाऱ्यांमुळे सुस्थितीत असतो. प्रवीण गावडे, नितेश गावडे आणि स्वप्नील साटल्ये हे अनेक वर्षे संस्थेत प्रामाणिक सेवा बजावत आहेत. म्हणूनच त्यांना रावबहादूर सी. के. बोले याना पुष्पमाला अर्पण करण्याचा बहुमान मिळाला. त्याचप्रमाणे हॉलच्या खानपान सेवेची मोनोपॉली असलेले पंचामृत कॅटरर्सचे कर्मचाऱ्यांनीही रावबहाद्दूर बाबासाहेब बोले यांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक होत त्यांना आदरांजली अर्पण केली.