Sunday, November 10, 2024

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeआपले सरकारसॅटिसला गती द्या

सॅटिसला गती द्या

संग्रहित छायाचित्र

कुर्ला विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुंबई, दि. ६ : मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी सॅटिस महत्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई महापालिकेने सॅटीस प्रकल्पाला गती द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

कुर्ला मतदारसंघातील विविध प्रश्नांची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार मंगेश कुडाळकर, माजी खासदार राहुल शेवाळे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, विकास खारगे, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, की कुर्ला मतदासंघातील वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी उपलब्ध जागेत बॉटनिकल गार्डन साकारावे. चुनाभट्टी येथील रेल्वे फाटकच्या जागी उड्डाणपूल निर्माण करण्याच्या कामाला रेल्वेच्या सहकार्याने गती देण्याचे निर्देश ही त्यांनी दिले.

यावेळी कुर्ला विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना सूचना दिल्या.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध