Sunday, February 9, 2025

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeब्रेकिंग न्यूजसण गणपतीचा, आनंदाचा!!

सण गणपतीचा, आनंदाचा!!

सर्वत्र आनंदाला उधाण

निर्माती व दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या अभिनेत्री अर्चना नेवरेकर, स्मिता जयकर, रेखा सहाय आणि वीणा सिंग. वनस्पतीजन्य वस्तूंपासून केलेली आरास हे कांचन अधिकारी यांच्या घऱातील गणेशोत्सवाते खास वैशिष्ट्य आहे.

मुंबई ः  मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष आहे. सर्वत्र आनंदाला उधाण आले आहे. गणेशोत्सव हा सण असा आहे की गरिबापासून   श्रीमंतापर्यंत सर्वच जण आपापल्या परीने हा सण साजरा करतात. मात्र त्यांना  मिळणाऱ्या आनंदाचे  परिमाण एकच असते. कोणी  झोपडीत गणेशाची प्रतिष्ठापना करतो, कोणी बंगल्यात करतो , तर कोणी महालात करतो. मात्र श्री गणेश आनंद सर्वाना सारखाच देतो.

बावडेकरांच्या घरी

गोकर्णचा महागणपती

गायक अभिनेते अमोल बावडेकर यांच्या घरी विराजमान झालेली गोकर्ण येथील महागणपतीची प्रतिकृती

कोणी दीड दिवसाने गणारायाच्या मूर्तीचे विसर्जन करतो, तर कोणी पाच दिवसांनी, कोणी सात दिवसांनी तर कोणी अकरा दिवसांनी गणरायांच्या मूर्तीचे विसर्जन करतो. कोणी तळ्यात, कोणी  कृत्रिम तलावात, कोणी नदीत, कोणी डोहात, तर कोणी समुद्रात मूर्तीचे विसर्जन करतो. हे ज्याच्या त्याच्या मनुष्य बळावर अवलंबून असते. मात्र त्याच्या भावभक्तीत जराही कमतरता नसते. म्हणून ज्याच्याकडे गणरायाची प्रतिष्ठापना होते तो आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना आवर्जून गणरायाच्या दर्शनासाठी निमंत्रित करतो. साधू-संत येती  घरा तोचि दिवाळी दसरा, अशी आपल्याकडे म्हण आहे. मात्र गणेशोत्सवात मनात भावभक्ती ठेवून येणारा प्रत्येकजण हा साधू-संतच असतो. म्हणून तर आपण त्यांचे हसतमुखाने आणि आनंदाने स्वागत करतो.

 

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध