Sunday, November 10, 2024

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

HomeUncategorizedसीपीडीतर्फे लोकशाहीचा जागर

सीपीडीतर्फे लोकशाहीचा जागर

मुंबईत आठवडाभर विविध कार्यक्रम

मुंबई, दि. १५ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त सीपीडी (‘सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रसी) तर्फे आजपासून लोकशाहीच्या वृद्धीसाठी लोकशाहीचा सन्मान, संविधानाचा सन्मान तसेच संविधानाचा प्रचार-प्रसार आणि लोकशाहीची मूल्य जनमानसात रुजविण्यासाठी लोकशाहीचा जागर सप्ताह अभियान राबविण्यात येत आहे.
१५ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो. सीपीडी संस्थेने १५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी ‘ लोकशाहीचा जागर सप्ताह-निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
लोकशाही वर चर्चा व्हावी, चिंतन व्हावे , भारतातील लोकशाहीमध्ये फक्त मत अधिकार देणे हे लोकशाहीला अभिप्रेत नाही तर शासन प्रशासनामध्ये निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग कसा वाढेल, या दृष्टिकोनातून लोकशाही सशक्त आणि सुदृढ लोकशाही होवून लोकांमध्ये प्रचार आणि प्रसार होण्याकरिता लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे.

लोकशाही दिनानिमित्त लोकशाहीवर चर्चा करण्याची संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सीपीडीच्या वतीने
मंबईतील वस्त्यांमध्ये पथनाट्य, परिसंवाद आणि कला प्रदर्शनाच्या माध्यमातून मंबईभरात लोकशाहीची पंचाहत्तरी साजरी करण्यासाठीची अंधेरी पश्चिमेतील सिद्धार्थ नगर, या श्रमिक वस्तीतील युवकांनी पुढाकार घेत पथनाट्यद्वारे सुरुवात केली आहे.

उद्या (१६ सप्टेंबर)पासून २१ सप्टेंबरपर्यंत जय भीम नगर (रे रोड), इंदिरा गांधी नगर (शिवडी) , मंडाला (मानखुर्द), भीम नगर (मानखुर्द), चिकुवाडी (बोरिवली) , गणपत पाटील नगर
(दहिसर) या वस्त्यांमध्ये ‘कहानी लोकतंत्र की!’ या विषयावरील पथनाट्य आठवडाभर सादर करण्यात येणार आहेत.

गोरेगाव पश्चिमेतील केशव गोरे स्मारक ट्रस्ट येथे १८ सप्टेंबर रोजी ‘लोकशाही व आम्ही भारताचे लोक’ या विषयावर सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, बुद्धिवंत आणि संविधानप्रेमी विशेष तज्ञांचा परिसंवाद ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर कला प्रदर्शनाचे सुध्दा आयोजन केले असल्याचे सीपीडीचे समन्वयक विशाल जाधव यांनी सांगितले.

लोकशाहीच्या जागर सप्ताह’ मध्ये मुंबईतील संविधानप्रेमी आणि लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येक भारतीयाने सहभागी व्हावे व लोकशाहीचा प्रचार-प्रसार करावा.

— विशाल जाधव,अभियान समन्वय

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध