Monday, March 17, 2025

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeकोकणअटल 'टोल' अटळ

अटल ‘टोल’ अटळ

शिवडी-न्हावाशेव पसरलेल्या अटल सेतूवर सध्या सवलतीच्या दरानेच करआकारणी होत आहे.

शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूवर
सध्याच्याच सवलतीच्या दराने

टोल वसुली

मुंबई : अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी एक वर्षभर पथकर आकारणी करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे इतर ठिकाणच्या टोल नाक्यावरील पथकराप्रमाणे इथला कर नसला तरी सवलतीच्या दरातील कर कायम राहणार आहे. शिवाय तो पुढील वर्षात वाढ होण्याचीच शक्यता अधिक आहे.

अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरिता यापुर्वी ४ जानेवारी २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत एमएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या दराच्या ५० टक्के सवलतीच्या दराने पथकर (कमीत कमी २५० रुपये इतका) आकारणीचा निर्णय घेण्यात आला होता. या दराचा एक वर्षानंतर आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक वर्षभर म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सध्या सुरु असलेल्या सवलतीच्या दरानेच पथकर आकारणीस मान्यता देण्यात आली.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात आलेला हा सुमारे २२ किलोमीटर लांबीचा अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू प्रकल्प १३ जानेवारी २०२४ पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
सध्या मुंबईत शिरणाऱ्या आणि मुंबईतून बाहेर पडणाऱ्या चार चाकी वाहनांना टोल आकारला जात नाही. याप्रमाणे अटल सेतूवर कारमाफी व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे. पण ते शक्य होणार नाही. सुधारणा हव्या असतील तर त्यासाठी पदरमोड करण्याची आवश्यकता आहे. मात्र लोकांचे दुखणे एकच आहे की, लोक टोल द्यायला तयार असतात, पण रस्त्याच्या बांधकामाला झालेला खर्च वसूल झाला तरी टोल वसुली चालूच असते. लोकांचा त्याला विरोध आणि त्याविषयी मनात रागही आहे.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध