Friday, April 18, 2025

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeब्रेकिंग न्यूजदेवी श्री महामाईचे तवसाळ गावी आगमन

देवी श्री महामाईचे तवसाळ गावी आगमन

तवसाळ, पडवे, तांबड, बाबर, रोहिले या पंचक्रोशीचे ग्रामदैवत असलेल्या महामाई, सोनसाखळी, त्रिमुखी, सोमजाई, रवळनाथ यांची पालखी.

दीड महिना मिळणार

देवीच्या दर्शनाचा लाभ

गुहागर ः रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या तवसाळ पंचक्रोशीचे ग्रामदैवत देवी श्री महामाई-सोनसाखळी, त्रिमुखी, सोमजाई आणि बावा रवळनाथ यांच्या पालखीचे आज धुळवडीच्या दिवशी (धुलिवंदन) तवसाळ खुर्द येथे आगमन झाले असून दीड महिना भाविकांना दैवतांचे दर्शन घेता येणार आहे. हाकेला धावणारी, नवसाला पावणारी आणि माहेरवासिणींची पाठराखण करणारी अशी या देवीची ख्याती आहे.  

दीड महिना वास्तव्य

तवसाळ खुर्द येथे आज आगमन झालेल्या पालखीचे अक्षय तृतीयापर्यंत म्हणजेच सुमारे दीड महिना गावातच सहाणेवर वास्तव्य राहणार आहे. त्यामुळे हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या देवी श्री महामाई-सोनसाखळीच्या दर्शनाचा लाभ जिल्ह्यातील भाविकाना मिळणार आहे.

जिल्ह्याबाहेरही महती

मागील महिन्यात १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी चार दिवसात देवीच्या जीर्णोद्धारित मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला, त्याचबरोबर कलशारोहण सोहळाही झाला. हा सोहळा ‘न भूतो, न भविष्यती’ नेत्रदीपक झाला. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या भजनी मंडळानी त्यांचा भजनातून गायलेली देवीची महती जिल्ह्याबाहेरही पोहोचली आहे. त्यामुळे यंदा देवीच्या दर्शनाला मोट्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे श्री महामाई सोनसाखळी देवस्थान ट्रस्टने भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे.

उद्या होम

होलिकोत्सवादिनी रात्री होमाभोवती प्रदक्षिणा होत असताना

तवसाळ, पडवे, तांबड, बाबर आणि रोहिले या पंचक्रोशीचे असलेल्या या ग्रामदैवताची पालखी गुरुवारी होम पेटल्यानंतर शुक्रवारी सकाळी तवसाळ खुर्द येथे आली. आज हळदी-कुंकू घेण्यासाठी केवळ तवसाळ गावातील घरोघरी ही पालखी जाईल. पहाचे सहाणेवर विरोजमान होऊन शनिवारी दुपारी तवाळ गावी प्राथमिक शाळेजवळ होमापाशी येईल. तेथे पारंपरिक पद्धतीने ग्रामस्थांचा तमाशा होईल. तेथून पालखी रोहिले येथे होमापाशी जाईल. रोहिले येथून आल्यानंतर पालखी सहाणेवर सतरंजीवर विराजमान असेल. रंगमंचमीपर्यंत गावातील तरुणाई पालखीनृत्याचा कार्यक्रम करील. यावेळी आजूबाजूच्या गावातील लोकही पालखीनृत्यासाठी येत असतात. रंगपंचमीदिवशी मात्र पालखी सहाणेवर विराजमान होईल. या दिवशीही देवीसमोर शेकडो वर्षांची परंपरा असलेला ग्रामस्थांचा तमाशा होईल. त्यांतर अक्षयतृतीयेपर्यंत पालखी सहाणेवरच स्थानापन्न असणाऱ आहे.

तरुणाईचा ओसंडून वाहणारा उत्साह

तरुणाईचा ओसंडणारा उत्साह

आपले ग्रामदैवत गावात येणार म्हणून तरुणाीचा उत्साह ओसंडून वाहत होता. देवीच्या स्वागतासाठी आबालवृद्ध गडी (पैलवान) टॉवेल बांधून सज्ज होते. गावात येताच पालखी नाचवण्यासाठी तरुणाईत अहमहमिका सुरू होती. हाच जोश रंगपंचमीपर्यंत चालणार आहे.

 

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध