Wednesday, January 21, 2026

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमुंबईपाणीउपसा पंपाच्या संख्येत घट

पाणीउपसा पंपाच्या संख्येत घट

पर्जन्यजलवाहिन्यांच्या विस्तारामुळे पाणी साचण्याच्या ठिकाणांमध्ये घट झाल्याचा परिणाम

मुंबई : मुंबईत पाणी साचण्याच्या ३८६ ठिकाणांवर मागील वर्षी ४८२ पाणीउपसा पंपांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र मागील वर्षभरात पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे विस्तारल्याने यंदा तितक्या संख्येने पाणी उपसा पंपांची गरज भासणार नसल्याने यंदा ४१७ पाणीउपसा पंपांची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र हे पाणीउपसा पंप पूर्ण क्षमतेने चालतील अशी त्यांची देखभाल कटाक्षाने ठेवण्याबाबतचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

पश्चिम उपनगरातील नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची श्री. बांगर यांनी काही दिवसांपूर्वी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी हे उदंचन पंप पावसाळ्यात बंद पडता कामा नये. उदंचन पंपांची यंत्रणा व पर्यायी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहिली पाहिजे. अभियंत्यांनी अनुभवाच्या आधारावर पाणी साचण्याची ठिकाणे पूरमुक्त करावित, कामामध्ये नाविन्यता आणावी, असे निर्देश श्री. अभिजीत बांगर यांनी दिले. गाळ उपसा व वहन प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होणार नाही, यासाठी अभियंत्यांनी दक्ष रहावे, त्रुटी आढळली तर कंत्राटदारांसमवेत अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल, असा इशारादेखील श्री. अभिजीत बांगर यांनी दिला.

 

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील नदी व मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. श्री. अभिजीत बांगर यांनी पश्चिम उपनगरातील विविध ठिकाणांना १० मे २०२५ रोजी भेट दिली. त्यात वाकोला नदी (कनाकिया पूल), एस.एन.डी.टी नाला (गझधरबंद उदंचन केंद्र), ओशिवरा नदी (मालाड), पिरामल न

पश्चिम उपनगरामध्ये वाकोला नदी मिठी नदीला जाऊन मिळते. त्यामुळे वाकोला नदीला ११ ठिकाणी पूरप्रतिबंधक दरवाजे बसविण्यात आले आहेत. गतवर्षी पावसाळ्यात गोळीबार परिसरातील डिझेल जनरेटर पंप बंद पडला होता. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवली होती. त्यामुळेउदंचन पंप बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेल जनरेटर संच तातडीने उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याचे निर्देश श्री. अभिजित बांगर यांनी दिले. तसेच परिसरातील १२ उदंचन पंपांचा एक गट तयार करून पर्यायी व्यवस्था म्हणून वाहनावर बसविण्यात आलेला एक डिझेल जनरेटर संच उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना त्यांनी केली. तसेच फिरते उदंचन पंपदेखील तयार ठेवावेत. तातडीच्या प्रसंगी या पर्यायी व्यवस्थेचा प्रतिसाद झटकन मिळाला पाहिजे, जेणेकरून मोबाईल उदंचन पंप अथवा डिझेल जनरेटर संच तातडीने घटनास्थळी पोहचवता आले पाहिजेत, असे निर्देश श्री. अभिजीत बांगर यांनी दिले. जेथे आवश्यक त्याच ठिकाणी उदंचन पंप कार्यान्वित करावेत, विनाकारण खर्च नको, असेदेखील श्री. बांगर यांनी नमूद केले.

एसएनडीटी नाला व गझधरबंद उदंचन केंद्र येथे नाल्याभोवती लोखंडी जाळी लावण्याचा फायदा झाला आहे. या जाळ्यांमुळे घरगुती कचरा नाल्यामध्ये येण्याचे प्रमाण ९० टक्क्यांनी खाली आले आहे. याच धर्तीवर दाट लोकवस्तीच्या ठिकाणी नाल्यांभोवती दुतर्फा लोखंडी जाळ्या लावाव्यात. तसेच नाल्याच्या कडेला साचलेल्या घनकचरा, राडारोड्याची तातडीने विल्हेवाट लावावी. मागील वर्षी या परिसरात पाणी साचण्याची २४ ठिकाणे होती. मात्र आता पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे विस्तारल्याने पाणी साचण्याची १३ ठिकाणे कमी करण्यात विभागाला यश आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणी साचण्याची ११ ठिकाणे शिल्लक राहिली असून पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे अधिक विस्तारत ही ठिकाणेदेखील पाणी साचणार नाही, यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना श्री. अभिजीत बांगर यांनी दिल्या.

इर्ला व मोगरा नाले हे ओशिवरा नदीला येऊन मिळतात. भरतीच्या काळात मोगरा नाल्याच्या प्रवाहावर परिणाम होऊन पावसाळ्यात सखल भाग असलेल्या अंधेरी भूयारी मार्गात पाणी साचते. मात्र, पावसाळ्यातदेखील अंधेरी भूयारी मार्गातून होणारी वाहतूक सुरळीत सुरू राहिली पाहिजे, त्यासाठी अधिक दक्ष राहिले पाहिजे. याठिकाणी आवश्यक क्षमतेचे उदंचन पंप उपलब्ध असावेत, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले. याच परिसरात वि.रा. देसाई मार्ग याठिकाणी पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी बॉक्स ड्रेनचे काम सध्या सुरू आहे. हे काम जलद गतीने मार्गी लावावे, असेदेखील निर्देश श्री. बांगर यांनी दिले.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध