Wednesday, February 18, 2026

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमुख्य बातम्याशिंदे यांचा संबंधच काय? मुख्यमंत्र्यांनी कोणाला झिडकारले?

शिंदे यांचा संबंधच काय? मुख्यमंत्र्यांनी कोणाला झिडकारले?

मुंबई ः साताऱ्यात सावरी गावातील रिसॉर्टमध्ये सापडलेल्या ४५ किलो ड्रग्जमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संबंधच काय, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे सुषमा अंधारे यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष केले, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना क्लीनचीट दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सातारा जिल्ह्यात १३ डिसेंबरला जावळी तालुक्यातील सावरी गावातील रिसॉर्टमध्ये सातारा पोलिसांनी धाड टाकत ४५ किलो ड्रग्जचा साठा पकडला. या ४५ किलो ड्रग्जची किंमत १४५ कोटी रुपये इतकी असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी  प्रसार माध्यमांना दिली. तसेच या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांचा कसा संबंध आहे, याबाबतची माहिती सुद्धा अंधारेंनी दिली. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर असे आरोप एखाद्या नेत्याविषयी मतपरिवर्तन करतात. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना क्लीन चीट दिली आहे.

या कारवाईबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम पोलीस विभागाचे अभिनंदन केले. पोलिसांनी त्या ठिकाणी चाललेल्या धंद्याचे पूर्णपणे पर्दाफाश करण्याचे काम केले. त्या ठिकाणी त्यांनी मोठी कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणीपूर्वक राजकीयदृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो चुकीचा आणि निषेधार्ह असल्याचे फडणवीस म्हणाले.
या प्रकरणात आतापर्यंत जे काही पुरावे समोर आले आहेत, त्यात एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा दुरान्वयानेही कोणताही संबंध नाही. त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारे दिशाभूल करून संबंध जोडण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात पूर्ण चौकशी सुरू असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी या लढ्याला डिमॉरलाइज करू नये. पुढील दोन दिवसांनंतर पुन्हा २२ आणि २३ डिसेंबरला नवीन माहिती घेऊन समोर येणार आहे, असेही अंधारे म्हणाल्या.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध