Wednesday, February 18, 2026

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमुंबईशिवसेना-मनसेकडून भुरळ

शिवसेना-मनसेकडून भुरळ

रवि राजा यांच्याकडून वचननाम्याची

चिरफाड

मुंबई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या ‘वचननाम्यात’ मुंबईकरांची पूर्ण फसवणूक करणारी अनेक वचने आहेत, असे म्हणत भाजपचे उमेदवार रवि राजा यांनी वाचनाम्याची चिरफाड केली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या वचननाम्यात अनेक आश्वासने अशक्यप्राय अशी आहेत. त्यातील दोन आश्वासने उदाहरणादाखल रवि राजा यांनी ठेवली आहेत.

रवी राजा यांनी म्हटले आहे की, मुंबईकरांना बेस्टकडून १०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल, असे एक वचन दिले आहे. मुळात विजेच्या संबंधित सर्व निर्णय हे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडून घेतले जातात. अशा निर्णयांचे अधिकार हे मुंबई महापालिका घेऊच शकत नाही. जे निर्णय तुम्ही घेऊच शकत नाही त्याबद्दलचे वचन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना देऊच कशी शकते? येथे मुंबईकरांची घोर फसवणूक आहे.

दुसरे वचन आहे महिला आणि विद्यार्थ्यांना बेस्ट बसेसच्या मोफत प्रवासाचे. मुंबई म्युनिसिपल ऍक्ट १८८८ च्या अंतर्गत कोणालाही बेस्ट बसचा प्रवास मोफत देणे शक्य नाही. अगदी पोलीस किंवा इतर सरकारी कर्मचाऱ्यांचे तिकिटाचे पैसे देखील सरकार देते. असे असताना महिला आणि विद्यार्थ्यांना मोफत प्रवास देऊच कसा शकतील?
हे खोटे वचन आहे, मुंबईकरांची दिशाभूल आहे
२५ वर्ष सत्तेत असलेल्यानी बेस्टची वाट लावली. बेस्टची सेवा जी एकेकाळी मुंबईची शान होती ती पूर्ण डब्यात घातली आणि आज हेच लोक पुढे येऊन खोटी आश्वासनं देत आहेत, असे म्हणत रवि राजा यांनी ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची चिरफाड केली आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत १८५ प्रभागातून निवडणूक लढवणार रवि राजा भाजपचे उपाध्यक्ष आहेत. काँग्रेसचे नगरसेवक असताना त्यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद भूषविले आहे. बेस्ट समितीतही ते होते. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांना त्यांनी कडाडून विरोध केला आहे. मात्र बहुमतापुढे त्यांचा विरोध विचारात घेण्यात येत नसे. आता ते भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.


रवि राजा यांची उद्या पदयात्रा
रवि राजा यांची उद्या (८ डिसेंबर) प्रभागात पदयात्रा निघणार आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ट्रान्झिट कॅम्प ब्लॉक नंबर १०/११/१२,आणि पूर्ण परिसरात ही पदयात्रा फिरेल. .

दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत सोशल नगर, टाटा पॉवर, गणेश विकास मंडळ, दुर्गा माता मंडळ आणि पूर्ण परिसरात ही पदयात्रा फिरेल. रवि राजा यांचा घरोघरी संपर्कावर जास्त भर आहे.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध