५३,४७,५१३ कोटींचा केंद्राचा बिग बजेट
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात गरिबी निर्मूलनासाठी तरतूद, देशाला गेल्या प्रगतीपथावर नेण्याचे उद्दिष्ट, गुंतवणुकीत होणारी वाढ यामुळे भारताची विकसीत भारताकडे वाटचाल सुरू राहील. जीएसटी सोपे बनविणे आणि रोजगाराच्या संधी वाढवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे देशाचा विकासाचा रोडमॅप ठरेल.५३ लाख ४७ हजार ५१३ कोटींचा हा बिग बजेट सादर करण्यात आला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज (1 फेब्रुवारी 2026) देशाचा अर्थसंकल्प मांडला. निर्मला सीतारमण यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. आम्ही देशातील गरिबी निर्मूलनासाठी महत्वाचे काम केले. देश गेल्या 12 वर्षांपासून प्रगतीपथावर आहे. देशात गुंतवणुक वाढीला लागली आहे. भारताची विकसीत भारताकडे वाटचाल सुरू राहील. जीएसटी सोपे बनवणं आणि रोजगाराच्या संधी वाढवणं हे आमचं उद्दिष्ट आहे, असं निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
या गोष्टी स्वस्त
केंद्र सरकारच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात कॅन्सरची औषधं, मधुमेहाची औषधे, कपडे, चामड्याचे बूट, क्रीडा साहित्य, मोबाईल फोन, ईव्ही बॅटरी सौर पॅनेल, सीएनजी, वैद्यकीय उपकरणे, एलसीडी, एलईडी, भारतात बनवलेले कपडे, ईव्ही वाहने, मोटारसायकल, फ्रोझन मासे, ईव्ही लिथियम बॅटरी, वैद्यकीय उपकरणे, लिथियम आयन बॅटरी, अपघात विमा या बाबी स्वस्त झाल्या आहेत.
या गोष्टी महाग
अर्थसंकल्पातून इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले, खनिज, दारु,पीव्हीसी फ्लेक्स शीट्स या गोष्टी महाग झाल्या आहेत.
निर्मला सीतारामन यांच्या घोषणा
राष्ट्रीय हातमाग धोरण कारागिरांना प्रोत्साहन आणि समर्थन प्रदान ● शैक्षणिक संस्थांना तांत्रिक सहाय्य शक्य ● मेगा टेक्सटाइल पार्क स्थापन करणार ● महात्मा गांधी ग्राम स्वराज योजनेंतर्गत खादीला प्रोत्साहन देण्यासाठी – उत्पादन, प्रशिक्षण आणि विपणनासाठी एक जिल्हा, एक उत्पादन याला प्रोत्साहन ●.क्रीडा – उपकरणे डिझाइन आणि उत्पादन करण्याची योजना ● औद्योगिक समूह – पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान सुधारण्यासाठी एक योजना तयार करणार ●
एमएसएमईसाठी – सूक्ष्म उद्योगांना मदत करण्यासाठी स्वावलंबी भारत निधी तयार ●
सरकारी संस्थांना अल्पकालीन मॉड्यूलर अभ्यासक्रम डिझाइन करण्याचे निर्देश ● टियर 2 आणि 3 स्तरांपर्यंत प्रशिक्षण दिले जाईल●
मालवाहतुकीसाठी मालवाहतूक कॉरिडॉर बांधले जातील ● 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या टियर-2 आणि 3 शहरांच्या विकासासाठी ₹11.2 लाख कोटींचे वाटप●. 2026-27 मध्ये ही रक्कम 12.2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाईल. ● खासगी विकासकांसाठी पायाभूत सुविधा जोखीम हमी निधी तयार ● मालवाहतुकीसाठी एक समर्पित फ्रेट कॉरिडॉर बांधला जाईल. ● वाराणसी आणि पटना विकसित करून अंतर्गत जलमार्ग विकसित करणार ● 7 हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधणार ●
देशातील सीप्लेन उत्पादकांना पाठिंबा दिला जाणार ● मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बेंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई आणि सिलिगुडी ते वाराणसी यासह सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधणार ●

