Sunday, August 16, 2026

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeमहाराष्ट्ररस्तोरस्ती सत्कार निलेश सुर्वेंचा

रस्तोरस्ती सत्कार निलेश सुर्वेंचा

तरुणाईचा उत्स्फूर्त जल्लोष

शृंगारतळी : पडवे पंचायत समिती गणातून अपेक्षेप्रमाणे निवडून आलेले भाजपचे उत्तर रत्नागिरी सरचिटणीस निलेश विश्वनाथ सुर्वे यांचा रस्तोरस्ती होणारा सत्कार त्यांच्या लोकप्रियतेची ग्वाही देत होती.

के केवळ पक्षाने तिकीट दिले म्हणून निलेश सुर्वे यांनी निवडणूक लढवली नव्हती. तर निवडून येण्याची खात्री म्हणूनच भाजपने त्यांना तिकीट दिले होते. कारण निलेश सुर्वे अनेक वर्षे भाजपचे कार्यकर्ते आहेत म्हणून भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि निलेश सुर्वे यांनी भाजपचा विश्वास सार्थकी लावला. त्यामुळेच त्यांचा रस्तोरस्ती सत्कार करण्यात येत होता.

निलेश सुर्वे हे पडवे पंचायत समिती गणातून निवडून आले असले तरी जेथे मतमोजणी केंद्र होते त्या पाटपन्हाळे महाविद्यालयापासून त्यांच्या सत्काराला सुरुवात झाली, जेथे उमेदवार म्हणून निलेश सुर्वे यांचा संबंध नव्हता, पण माणूस म्हणून ते लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांचा रस्तोरस्ती सत्कार होत होता. ही निवडणूक पंचायत समितीची होती, पण निलेश सुर्वे यांच्या सत्काराचा थाट विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारासारखा होता. आपल्या विजयाचे श्रेय निलेश सुर्वे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक मेहनतीला दिले. माझ्या पोरांनी (सहकारी कार्यकर्त्यांनी) वेळेची पर्वा न करता केलेली आणि मतदारांनी मोठ्या विश्वासाने केलेले मतदान यामुळेच खात्रीशीर विजय मिळाल्याचे निलेश सुर्वे आदरपूर्वक कबूल करतात.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध