Thursday, October 16, 2025

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeब्रेकिंग न्यूजआचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन

मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

मुंबई, दि. १४: महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शनादेवी यांच्यासमवेत आज मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज्यपाल श्री. देवव्रत यांचे स्वागत केले. कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, रेल्वे पोलीस महासंचालक प्रशांत बुरुडे, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, मुंबई शहर जिल्हाधिकारी आँचल गोयल तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. देवव्रत यांना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे रेल्वे पोलीस विभागामार्फत मानवंदना देण्यात आली.

नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत हे १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पदाची सूत्रे स्वीकारून त्यांचा शपथविधी समारंभ होणार आहे.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध