‘एकपात्री’मध्ये दाखविली झलक
मुंबई : मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे माहीमच्या सरस्वती विद्यामंदिर हायस्कूलची विद्यार्थिनी कु. आर्या आलिमचा हिचा ओढाही अभिनय क्षेत्राकडे असल्याचे दिसत आहे. तिला एकपात्रीच्या दोन स्पर्धांमध्ये दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला आहे.
कु. आर्या इयत्ता ९ वी मध्ये शिकत आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई आयोजित तालुकास्तरीय कला उत्सवमध्ये कु. आर्या हिने नाट्यसमूह (एकपात्री प्रयोग)मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. तर महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन आयोजित सहशालेय उपक्रमाअंतर्गत एकपात्री प्रयोग (गट क्रमांक २) मध्ये तृतीय क्रमांक पटकावला. तिला श्री. युवराज बन्सी अवसरमल सरानी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव श्री. संजय सुखटणकर व संस्थेचे विश्वस्त डॉ. आशिष मुळगावकर यांनी तिचे कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. मारुती चाबुकस्वार, उपमुख्याध्यापिका श्रीमती शामल बिनसाळे, पर्यवेक्षक श्री. कृष्णात जाधव सर यांचे आर्या हिला मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन दरवर्षी अनेक स्पर्धा आयोजित करीत असते.