Thursday, October 16, 2025

संपादक : अरविंद (आप्पासाहेब) सुर्वे

Homeकोकणशुभ्रा सुर्वे हिचे धवल यश

शुभ्रा सुर्वे हिचे धवल यश

नवोदय विद्यालय प्रवेशाबरोबरच
शिष्यवृत्तीतही प्रथम क्रमांक


शुभ्रा प्रियांका निलेश सुर्वे

नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळविणारी
तवसाळच्या सुर्वे परिवारातील
शुभ्रा ही पाचवी विद्यार्थी

गुहागर : गुहागर (guhagar) तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ (Tavasal)नंबर १ ची विद्यार्थिनी कुमारी शुभ्रा निलेश सुर्वे हिने नावाप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रात धवल यश संपादन केले आहे. .गुहागर तालुक्यामधुन जवाहर (Javahar Navoday vidyalay) नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्रता परीक्षेत पाच विद्यार्थ्यांमध्ये शुभ्रा सुर्वे हिचा अग्रक्रमांक (९२%) पटकावलाच; शिवाय नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालामध्ये गुहागर तालुका ग्रामीण विभागातून शुभ्रा सुर्वे हिने ७२ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.

पहिलीपासूनच चुणूक
शुभ्राने इयत्ता पहिलीपासुनच आपल्या सर्वांगीण शैक्षणिक कौशल्याची चुणूक दाखवली आहे. शालेय स्तर, केंद्र स्तर, बीट स्तरावर विविध स्पर्धांमध्ये तिने आपले कौशल्य दाखवून दिले होते. वकृत्वामधे तिचे विशेष नैपुण्य आहे. शुभ्राच्या यशामध्ये जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नंबर १ चे मुख्याध्यापक श्री. संदीप खंडगावकर, सहशिक्षक श्री. रविंद्र राठोड यांचे मोलाचे योगदान आहे. शुभ्राच्या यशस्वीतेसाठी आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तवसाळ पंचक्रोशीचे खोत श्री. मोहन (बंधु) गडदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. जगदीश गडदे, ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष श्री. विज्ञान सुर्वे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री. सत्यवान गडदे, ग्रामपंचायत उपसरपंच श्री. प्रसाद सुर्वे, अंगणवाडी सेविका श्रीमती छाया सुर्वे, तसेच सर्वश्री राजेश सुर्वे, प्रदीप सुर्वे, श्याम गडदे, विजय शिवकर, उदय शिरधनकर, प्रितम सुर्वे, किरण गडदे, तसेच श्रीमती मनिषा मयेकर, मोहिनी सुर्वे, मनस्वी सुर्वे, हर्षदा गडदे, अभिसलाम वाडकर, केंद्रप्रमुख चिपळूणकर सर यांनी अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचाली करता शुभेच्छा दिल्या आहेत.

‘कल्पवृक्षांच्या छायेत’ला नवोदयी परिवार
“कल्पवृक्ष” या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या तवसाळच्या सुर्वे परिवारातील नवोदय विद्यालयाच्या पात्रता परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन प्रवेश मिळविणारी शुभ्रा ही “पाचवी” विद्यार्थिनी आहे. श्री. रोहन प्रमोद सुर्वे, सौ. ऋतुजा रोहन सुर्वे, कु. मृण्मयी जयंत सुर्वे, कु. सार्थक सचिन सुर्वे या विद्यार्थ्यांनी यापूर्वी नवोदय विद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण करून उज्वल भविष्याकडे वाटचाल केली आहे.
उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपाचे नेतृत्व करणारे श्री. निलेश विश्वनाथ सुर्वे आणि काताळे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. प्रियांका निलेश सुर्वे यांची शुभ्रा ही थोरली कन्या आहे.

या विभागातील इतर बातम्या

सर्वाधिक प्रसिद्ध